Music Theorapy

मध्यंतरी एक डॉक्टरांसोबत म्युसिक थेरपी बद्दल बोलत असताना एकदम लक्षात आलं की आपण एक गाण्याचा कार्यक्रम घेऊ कुठे तरी अस डोक्यात चालू होतं.

एक दिवस आमचे एक परिचित आहेत अमित सोमण त्यांचा फोन आला की जरा भेटू आपण काम आहे , आणि भेटलो ते म्हणाले आम्ही ‘ रफीयत ‘ नावाने दोन तासाचं गाण्याचं प्रोग्रॅम करतो कोणते जेष्ट नागरिक संघ किंवा वृद्धाश्रम आहे का ओळखीत आम्हाला सांगाल का?

माझ्या डोक्यात हेच होत पण म्हणलं भेटूनच बोलू , ठरलं तर मग मी तुमचे प्रोग्रॅम लावणार.

सध्या काही महिने पासून पालाश केअर सेन्टर ला जाण येणं होत आहे तर त्यांनाच विचारू , मग तिथे डॉक्टर शिल्पा मॅडम आणि डॉक्टर मेधा मॅडम ह्यांना ह्या प्रोग्रॅम विषयी सांगितलं त्या पण लगेच हो म्हणाल्या आणि प्रोग्रॅम ठरला.

खर धाकधूक होतीच की सगळे आज्जी आजोबा ना आवडेल का? , त्यांना बार वाटेल ना ?, एन्जॉय करतील का? , खर तर रफी हे त्याच्याच काळातले त्यामुळे तस त्यांना आवडेल अस वाटत होते.

मग काय पाहता पाहता प्रोग्रॅम झाला सगळ्यांनी मनापासून एन्जॉय केला अगदी टाळ्या वाजवत होते , गाणं गुणगुणत होते.

हे सगळं पाहून खूप समाधान वाटत होते.

तिथल्या एका आज्जीने मला बोलावून घेतलं हळूच कानात म्हणल्या परत कधी करणार पण मुकेशदा च्या गाण्याचं करता येईल मला प्रचंड आवडतात त्याची गाणी.

तेवढ्या एक आज्जीने उच्चारला तेवढा लता ताईच्या गाण्याचं बघा ना आणि मग काय फर्माईश वर फर्माईश.

मी सगळ्यांना म्हणलं सगळे करू.

तो सगळं वेळ इतका प्रसन्न आणि छान गेला आणि हे सगळं पलाश च्या डॉक्टर शिल्पा आणि डॉक्टर मेधा मॅडम मुळे.

खूप खूप धन्यवाद..!

अमित सोमण आणि त्यांची टीम तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा अतिशय छान निवेदन , विडिओ क्लिप ,आणि सुदंर आवाज . मस्त झाला प्रोग्रॅम.

आम्ही जेष्ट लोकांसाठी असे काही छोटे छोटे प्रोग्रॅम करायचं विचार करत आहोत कोणाला काही प्रोग्रॅम ठेवायचं असल्यास किंवा असे काही प्रोग्रॅम असल्यास घ्यायचा असल्यास आम्हाला संपर्क करा.

आधार सर्व्हिसेस
मानसी कुलकर्णी अलकुंटे
9834746942