Munirabad Karnataka


स्थळ – मुनिराबद कर्नाटक

हॅलो अमन , बाबा ना फीट आलीये.

Care Center मधून फोन आलेला , त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असे संगीतल आहे. अमन ने लगेच मला सांगितलं.

मग आम्ही त्या care center फोन केला ,Ambulance पुढच्या 15 मिनिट मध्ये पोचली आणि अनुप दादा गेले दीनानाथ ला आणि काका ना ऍडमिट केलं. अशी वेळ पहिल्यांदाच की आम्ही नाही आणि Emergency आली.

बर आता महत्वाचे म्हणजे आम्ही गेलो होतो कुलदेवी दर्शन ला लग्नानंतर ची पाहिलच जत्रा आणि दर्शन.

कळात नव्हतं काय करायचं त्याची मुलं बाहेर परदेशी त्यात आम्ही पुण्यात नाही मग अमन आणि मी ठरवलं की जायचं पुण्याला पण हे coordination होई पर्यंत 11 वाजले.

आऊट साईडला असल्यांने आम्हाला काही मिळणं अवघड होतं मग coordination करत ,हॉस्पिटलमध्ये मधून पण फोन येत होते , मुलांचे फोन येत होते हे करत सकाळ झाली. पहाटे 5.30 ला आम्ही निघालो घरच्यांनी पण जा अस सांगितलं

आता एवढ्या लवकर गाडी मिळेल का माहीत नव्हतं म्हणून होस्पेट ला गेलो, होस्पेट वरून पुण्याला बस नाही मग हुबळी ला जायचं ठरलं. पण हुबळी ला 9 शिवाय बस नाही आणि पण आम्ही 6.30 ला च होस्पेट ला पोचलो एवढा वेळ घालवणं शक्य नाही म्हणून तिथल्या एक ऑटो वाला म्हणला मी सोडतो , मग काय 3 तास प्रवास करून ऑटो ने गेलो.

हुबळी आलो तेंव्हा पुण्याला 12 शिवाय बस नाही , त्या दिवशी कर्नाटक च election निकाल असल्याने कमी प्रमाणात बस वाहतूक होती पण करायचं म्हणून मग हुबळी पासून बेळगाव , परत बेळगाव पासून कोल्हापूर आणि finally कोल्हापूर पासून पुणे शिवशाही ने रात्री 11 ला पुण्यात पोचलो पण अख्या दिवस भरात मनात धाकधूक होती सतत हॉस्पिटलचे फोन , डॉक्टर विशाल देशपांडे हे ट्रीट करत होते त्यांनी पण आम्हाला फोन वर सगळ्या update करत होते , दीनानाथ मधले पण नर्स डॉक्टरांनी आमच्याशी पूर्ण संवाद करत होते त्यात घरच्यांची काळजी , काकांच्या मुलांचे फोन त्यांना तर आपल्या वडिलांची काळजी तर होतीच पण आम्हाला सगळं सोडून यावं लागलं त्याच पण वाईट वाटत होतं.

पुण्यात पोहचल्यावर हॉस्पिटलमध्ये गेलो काका वाटच पाहत होते त्यांना पाहून खूप बरं वाटलं, काका पाहून जिवात जीव आला.

आम्ही जाई पर्यन्त सगळ्या टेंस्ट झाल्या होत्या रिपोर्ट पण आले सगळे नॉर्मल होते पाहून आनंद झाला.

डॉक्टर म्हणले Discharge घ्या उद्या मग दुसऱ्या दिवशी सगळं हॉस्पिटल च झाला त्यांना परत त्या care centre ला सोडला आणि आता परत देवीच्या दर्शनाला जायचं ठरलं.

मग सिम्मी ताई ( स्मिथा रत्नम ) म्हणजे काका ची मुलगी, तिने मला सहज विचारलं की तुम्ही कुठं जाणार कस जाणार मी म्हणलं की बघू आता कशी बस वगैर मिळते का पण हुबळी पर्यंत जावं लागेल.

मला एक 10 मिन नंतर PDF पाठवली आणि ते होत विमानच तिकीट.

मी ते पाहून अवाक झाले. मी कधीही विमानात बसले नाही आणि अस ध्यानी मनी नसताना मला हे surprise मिळालं आणि त्या दिवशी परत जाताना आम्ही देवी ला विमानाने गेलो.

अनपेक्षित पणे घडणाऱ्या घटनाच मी विचार केला तेंव्हा देवीला सुरवातीला जाताना ट्रेन , मग ऑटो , बस आणि नंतर कार आणि डायरेक्ट विमान असा सगळा प्रकारचं प्रवास मी दोन दिवसात केला आणि नंतर टांगा सुद्धा.

कधी कधी आपल्या नकळतच देव आपल्याला अस काही देतो ना ज्याची आपण कधी विचार पण नाही करत.

परत पोहचल्यार जेव्हा दुसऱ्या दिवशी कुलदेवी दर्शनाला गेलो कुलदेवी च दर्शन घेऊन जी काय मनात possitivity जी काय आंतरिक शांतता मिळाली ऊर्जा मिळाली ती शब्दात नाही मांडू शकत.

पहिला विमान प्रवास असं घडेल वाटलं नव्हतं , जेव्हा मी विमानात बसले तेंव्हा वरून पुणे पाहताना मला जे वाटत होतं ना ते काही तरी वेळगच होत.

शेवटी काय जे पाहिलं असत ते कायम लक्षात रहातात.

पहिल्यांदाच कुलदेवी दर्शन , ज्यांच्या साठी आलो ते आमचे पाहिले आजोबा (ज्यांच्यामुळे आम्ही आधार सर्विसेस चालवू शकतो हे आलेला confidence ) आणि पहिला विमान प्रवास , ह्या सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट आमच्या घरचे त्यांनी आम्हाला दिलेला सपोर्ट आणि विश्वास पण एक वेगळाच अनुभव आला ह्या सगळ्या प्रसंगामुळे.