Care Taker for Dubai
Care Taker पाहिजे असे किमान रोज एक तरी फोन येतोच आणी नेहमी प्रमाणे आम्ही त्यांना माहिती देतो तो शोधतो आणि place करतो हे आता खूप सहज शक्य असत. पण यंदा थोडं वेगळ होत.
गौरी ताई च अमन ला msg आला की female care taker पाहिजे आहे , तर मिळेल का ?
अमन पटकन हो म्हणाला पण खरी गंमत पुढे होती.
फिमेल केअर टेकर (मावशी ) पाहिझे होती “दुबई” मध्ये आमच्यासाठी दुबई ला मावशी पाठवणं हे पहिल्यांदाच.
डायरेक्ट भारताच्या बाहेर मावशी ना पाठवायचं म्हणजे टेन्शन आणि जबाबदारी दोन्ही खूप मोठ होती तसं आमच्या कडे 1 वर्ष झाली राणजिता कावा ही मावशी काम करत होती खर तर ती एका आमच्या पेशंट कडे काम करत होत्या आणि आमच्या कडे वेळ खूप कमी होता ,कारण ज्यांच्या कडे दुबई ला पाठवायचं होत ते ही काही वेळा साठी पुण्यात आले होते तेवढ्याच वेळात ते सगळं करायचं होतं , भेटा भेटी झाली.
राणजिता ज्यांचे कडे होती त्यांनी पण तिला भेटायला जायला वेळो वेळी सोडलं आणि तिची एक मोठी opportunity म्हणून त्यांनी पण समजुतीने घेतलं त्यांना दुसरी बाई दिली आणि finally तीच दुबई च तिकीट आला.
पण आमच्या मनात धाकधूक होती पहिल्यांदाच एका मावशी ना एकट्याला भारत बाहेर पाठवायचं त्या ही कधी पुणे मुंबई च्या बाहेर कधी गेली नाही ,त्यातून डायरेक्ट out of india , कस होईल , ती जाईल ना नीट इमिग्रेशन पास करेल ना तिकडे गेल्यावर ती कस manage करेल.
अशी सगळी चिंता होती. Finally मी तिला सोडायला airport ला गेले ती आत गेली , म्हणलं तीच विमान take off होत नाही तो पर्यंत निघायला नको. पण तिचा फोन आला मॅडम तुम्ही जावा खूप वेळ आहे अजून काही लागलं तर फोन करते.
आणि तिचा फोन आला अमन सर मी निघाले ऑल ok. जीव भांड्यात पडला आणि माध्यरात्री क्लायंट च फोन आला की रणजीता ला receive केलं. सप्टेंबर ला ती गेली आणि आज ती पुण्यात अली तेंव्हा तिला पण एक वेगळाच कॉन्फिडन्स होता आणि आम्हाला पण खूप खूप thank you गौरी ताई आम्हाला opportunity दिलीत आणि शिरीन ताई आमच्या वर विश्वास ठेवला.
आणि last but not least रणजिता मावशी तुम्ही छान काम केलेत आणि आमच्यावर विश्वास ठेवून तिकडे गेलात. आमच्या आधार च्या journey मध्ये आमच्या कायम लक्षात राहील असा अनुभव होता हा आणखी म्हणजे ह्या सगळ्या cordination आणि communication च्या मागे आमचे अमन सर होते proud of u partner and Keep it up partner.