आमच्याबद्दल
आमच्या कामातून टिकतील, अशी नाती निर्माण करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो
जेव्हा तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा आम्हाला कॉल करा!

कारण काळजी घेणे हे फक्त एक काम नाही - ती जबाबदारी आहे
आई-वडिलांपासून दूर राहणं सोपं नसतं — सतत च्या काळजीने, तणावाने आणि आपण आत्ता तिथे नाहीत ह्या कल्पनेने मन व्यापून जातं. आधार सर्विसेस हे सगळं समजून घेतं. तुमचं आणि तुमच्या आई-वडिलांमधलं प्रेम आणि काळजी यांचं सेतू बनण्याचं काम आम्ही करतो — जेणेकरून तुमच्या आई वडिलांना अगदी तुम्ही द्याल तशी साथ, काळजी आणि प्रेम मिळेल.
२०२० साली आधार सीनिअर सिटिझन केअर टेकर सर्व्हिसेस, पुणे ची सुरुवात एका उद्दिष्टाने झाली घरबसल्या सेवा देणं आणि कुटुंबांना मन:शांती देणं. पण आम्ही तिथेच थांबलो नाही — आम्ही तरुण तरुणींना आणि महिलांना होम हेल्थकेअर क्षेत्रात अर्थपूर्ण करिअरची संधी देखील देत आहोत.
इतरांपेक्षा आम्ही वेगळे का?
आमचं काम फक्त शारीरिक औषधोपचार पुरवणं नाहीये — आमचं ध्येय आहे तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी एक प्रेमळ, सुरक्षित आणि आपलेपणाचं वातावरण तयार करणं. आधार सर्विसेसमध्ये प्रत्येक जेष्ठ नागरिकाला वाटतं की:
- ते जसे आहेत, तसे मौल्यवान आहेत
- त्यांचा समाजाशी संपर्क आहे
- त्यांना एक व्यक्ती म्हणून आदर आहे — त्यांच्या गरजा आणि गोष्टीची जाण आहे.
आमचे केअरगिव्हर्स फक्त सेवा देत नाहीत, ते एक नातं निर्माण करतात. त्यांना मिळतो खरा सच्चा सोबती, मनापासूनचा आधार देणारा आणि एक घरचं, आपुलकीचं वातावरण निर्माण करणारा. त्यामुळे देखभाल ही सेवा न राहता ती “जबाबदारी” बनते.
आधार सर्विसेसमध्ये आमचा ठाम विश्वास आहे -म्हातारपण म्हणजे निव्वळ औषधं, डॉक्टर, किंवा घरकामांची काळजी घेण्याचं वय नाही…हा आनंदाचा, निवांतपणाचा आणि आठवणींना उजाळा देणारा सोनेरी काळ असतो. आम्ही आयुष्याच्या ह्या टप्प्याला एक आनंदाचा, हसत खेळात जगण्याचा उत्सव बनवण्यासाठी काम करण्यावर विश्वास ठेवतो.
आधार सर्विसेसवर विश्वास का ठेवतात?
सुरक्षिततेला प्राधान्य
पारदर्शकता
समग्र दृष्टिकोन
चला एकत्र मिळून वृद्धांना मुख्य प्रवाहात आणूयात
आपल्या वृद्धांच्या सेवेसाठी एक विश्वासू सोबती – आधार सर्विसेस
तुमच्या पालकांसाठी योग्य सेवा निवडणे हा एक मोठा निर्णय आहे आणि तुमच्यासोबत या मार्गावर चालण्याचा आम्हाला अभिमान आहे. आधार सर्विसेसमध्ये, तुम्ही निश्चिंत राहू शकता की तुमच्या प्रियजनांची काळजी अशा व्यावसायिकांकडून घेतली जाते जे त्यांना कुटुंबासारखे वागवतात.
पुण्यातील घरी पुरवली जाणारी नर्सिंग सेवा असो, रुग्णसेवा असो किंवा तुमच्या पालकांसोबत गप्पा गोष्टींसाठी साथ हवी असो, आम्ही तुमच्यासाठी जीवन सोपे आणि उजळ करण्यासाठी येथे आहोत.

विश्वास
तुमच्या सोबत