Location

Narayan Peth, Pune 30

Openig Hour

24 Hours Available

header-logo.png

Take you to Australia

बाबा मी आलोय , तुम्हाला घेऊन जायला ऑस्ट्रेलिया ला.

रात्रीचे 12.30 वाजले होते माझा फोन वाजला , तेंव्हा कोरोना ची दुसरी लाट चालू होती त्यामुळे आम्हाला मदतीसाठी केंव्हाही फोन यायचे ,तेंव्हा मला फोन आला माझे नातेवाईक आहेत ठाकूर त्यांना त्रास होत आहे आम्ही त्यांना दीनानाथ ला घेऊन जात आहे तर ambulance ला फोन केला आहे ती आली तर ठीक, नाही तर तुम्ही पण बघून ठेवा. पण त्यांनी बोलावलेली ambulance आली आणि ते दीनानाथ ला आले , तेंव्हा पेशंट वाढत होते त्यामुळे सगळंच भीती च वातावरण होत , दीनानाथ ला पोहचले पण त्यांना बेड मिळत नाही म्हणून त्यांचा कॉल आला ,मग मी प्रयाग हॉस्पिटल, MJM ,जोशी ,रत्ना सगळी कडे कॉल करत होते मग पहाटे 4 ला आम्हाला बेड मिळाला त्या दोघांनाही दीनानाथ ला .

तेंव्हा काका म्हणाले आता उद्या पासून त्यांना काय हवं काय नको ते पाहशील का ? मग मी रोज जायचे , 16 दिवस रोज , पण त्यांचे चेहरे किंवा त्यांना मला पाहायला काय मिळायचं नाही , त्या लॉबी मध्ये डॉक्टर येई पर्यंत मी थांबायचे पण मी ज्यांच्या साठी जात होते ते काका काकू कोण आहेत हे मला माहित नसायचं त्यांना रोज कुठे ना कुठे शिफ्ट करायचे त्यामुळे मला त्यांना बघणं पण शक्य नव्हत, त्यात ते covid possitive त्यामुळे ते शक्यच नाही , पण ठाकूर असा आवाज आला की मी ओ द्यायचे , माहीत नाही पण त्या दोघांना मला बघता यावं म्हणून माझी धडपड नक्की असायची लांबून का होईना.

हे सगळं चालू असताना माझी त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झाला, 

मग एक दिवस डॉक्टर म्हणले मिस्टर ठाकूर ह्यांना उद्या डिशचार्जे मिळेल, हे ऐकूनच मला बर वाटल ,त्याचे मित्र नातेवाईक सगळ्यांशी फोन यायचे ते मला सांगायचे की काय नेऊन द्यायचे वगैरे , मी त्यांना पण कधी पाहिलं नव्हतं जे काही होत होते सगळं फोन वर.

मग डिस्चार्गे ची डेट ठरली आणि काका ना finally डिस्चाज मिळाला ,पण काकू ची तब्येत मात्र स्थिर होत नव्हती , अजून काही दिवस त्यांना ठेवावं लागणार होत ,व्हील चेअर वरून काका ना आणलं आणि मी पाहिलं त्यांना , काका ना कॅन्सर होता पण त्यांनी कोरोना वर मात करून ते माझ्या समोर होते , आता त्यांना मला नर्सिंग सेन्टर ला घेऊन जायचं होत , कारण मुलगा ऑस्ट्रेलिया ,बाहेर ची परिस्थिती अवघड , इकडे काकू ची तब्येत सुधारत नव्हती म्हणून काका ना care सेन्टर ला ठेवला होता ,एक दोन दिवसांनी काकूंना पण नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट केलं, आणि मग आम्ही त्यांना finally भेटायला जाऊ शकलो, त्यांना पाहिलं , भेटलो, थोड्या गप्पा मारल्या , आणि गप्पा मारता मारता अमन त्यांना म्हणला आता लवकर बऱ्या व्हा म्हणजे घरी येतो जेवायला तेवढ्यात त्या म्हणाल्या की मी पिझ्झा खूप मस्त करते या तुम्ही, मग तास भर गप्पा झाल्या , तेवढाच काय आम्ही एकमेकांशी बोललो , नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना परत ICU मध्ये शिफ्ट केलं कारण infection वाढत होत , त्या वेळी कोसो दूर बसलेल्या मुलाची धडपड दिसत होती , यायची इच्छा असूनही येऊ शकत नव्हता , काकूंना जेंव्हा ICU मध्ये शिफ्ट केलं त्यांची तब्येत जास्त च खालावत होती , म्हणजे काकू ICU मध्ये ,मुलगा ऑस्ट्रेलिया ला आणि काका नर्सिंग care सेन्टर ला ,त्यांचे नातेवाई हतबल कारण परिस्थिती बाहेर अवघड , काय परिस्थिती होती एका सकाळी साडे तीन वाजता फोन आला मला हॉस्पिटल मधून mrs ठाकूर is no more , ...................

4.15 मिन मी आणि अमन दीनानाथ ला

खर तर आज मी ठरवलं होतं की त्यांना त्यांच्या मुलाशी कॉल करून घ्यायचा नातींना मुलाला पाहिलं तर तब्येत थोडी बरी होईल पण .......

मग सगळ्यांन कॉल केले ,आम्हाला संध्याकाळी 7 वाजले त्यांचं उरले पर्यंत , तिकडे काका ना सांगू शकत नव्हतो , इंटरनॅशनल विमान बंद असल्याने त्यांचा मुलगा येऊ शकत नव्हता , खरच काही सुधारत नव्हतं पण म्हणतात ना वेळ सगळं निभावण्याची ताकत देत असते.

साधारण 4 दिवसांनी आम्ही त्याच्या घरी गेलो कीचन मध्ये पिझ्झा base पाहून डोळ्यात पाणी आलं , काकू च्या हातचा पिझ्झा खायला मिळणार नाही कधीच , एवढ्यात care सेन्टर शी बोलणं झालं की आता काका तसे ठीक आहे आपण त्यांना काकू बद्दल सांगू शकतो पण त्यांना ते किती कळेल किंवा किती accept करतील माहीत नाही असं counciler च म्हणणं आहे पण सांगावं तर लागणारच होत म्हणून संध्याकाळी त्यांच्या मुलाने विडिओ कॉल वर काका ना सांगितलं त्यांना सांगितलं खार पण त्यांना किती कळलं होतं काही अंदाज येत नव्हता.

मग सुरू झाली एक मुलाची परीक्षा , आई च काही करता आला नाही ह्याचा मनात एक सल ठेऊन बाबा ना इथे ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन यायचा प्रयत्न जिवाच्या आकांताने तो मुलगा करत होता.

आणि 7 महिन्याच्या त्याच्या प्रयत्नांना यश आलं ,तो जेंव्हा care सेंटर ला तेंव्हा "बाबा मी आलोय तुम्हाला ऑस्ट्रेलिया ला घेऊन जायला हे शब्द कानावर पडले आणि नाही सांगू शकत की काय वाटत होत , तेंव्हा काका च्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधान होत , काका ना काकु गेल्याच आम्ही साधारण 10 दिवसांनी सांगतील होत तेंव्हा त्यांना ते accept झाला नव्हता पण नंतर नंतर ते सुरेखा गेली का गेली का असा विचारात होते पण त्यांनाही काळात नव्हतं की काय कस झाला ,पण आज तो दिवस आला मुलाला समोर पाहून त्यांना जे काही वाटलं असेल ते ज्या काही भावना असतील त्या सांगू शकणार नाही.

पण finally आज तो होता.

आईच्या आठवणी साड्या च्या रुपात घेऊन बाबां ना घेऊन गेला आपल्या घरी , आज आम्हाला कुठे तरी समाधान वाटत होतं , त्यांना विमानतळावर ड्रॉप करताना मनात खूप समाधान वाटत होतं आणि साधारण 3 ते 4 वेळा finally finally बाबा ना घेऊन चाललो असं त्याच्या तोंडात येत होतं ,आणि आमच्या मनात होत की असे किती जण आहेत जे ह्या अश्या परिस्थिती मधून गेले असतील, जाताना त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहताना आमच्या डोळ्यात पाणी होत ,emotional झाला होतो , त्यांचं विमान उडे पर्यंत आम्ही तिकडेच थांबलो आणि " दादाच massage आला all ok all clear " आणि आम्ही डोक्यात हेच होत की long way to go.

ही 7 महिन्याची जर्नी एवढी जवळून अनुभवली होती ना की जाताना डोळे आणि मन भरून आलं होतं.

आधार सर्व्हिसेस

मानसी कुलकर्णी - 9834746942

अमन अलकुंटे - 8600908491

Comment

Leave a comment

Latest Blogs

Transitional-Care-transformedsd.jpg

Enhancing Quality of Life Comprehensive Patient Care at Home for Elders with Dementia

As our loved ones age, their needs evolve, especially for those living with dementia. Providing the more... February 19, 2024

1_nf2Loc8y4PFk0IGRVQYzKA_(1).jpg

Choosing the Right Patient Care Service at Home for Your Loved Ones

Choosing the Right Patient Care Service at Home for Your Loved Ones In the journ more... February 12, 2024

shortplayful-indian-asian-kid-grandfather-arm-wrestling-home-with-other-family-members-looking-wearing-white-cloths_466689-3463.jpg

Promoting Mental Wellness in the Aging Population

As individuals age, maintaining mental wellness becomes increasingly vital for overall well-being an more... February 06, 2024

imgpsh_fullsize_anim4545.jpg

From Loneliness to Joy The Impact of Companionship Care on Seniors

In the serene city of Pune, where tradition meets modernity, a silent revolution is taking place in more... January 22, 2024

doctor-help-care-asian-senior-elderly-use-walker-park_39768-3599.jpg

Elevating Elder Care Expert Nursing for Intricate Health Challenges

As the relentless march of time persists, our society undergoes a profound demographic shift, witnes more... January 16, 2024

Testimonial

Retirement has become an adventure thanks to these senior services. Engaging activities and a sense of belonging have enriched my life in unexpected ways.

Ranjan Dongol

The senior services here have breathed new life into my days. The welcoming community and engaging activities have added vibrant colors to my life's canvas

Santosh KC

This senior services program erased my fears of loneliness. Outings, seminars, and newfound friendships have made my golden years truly shine

Shilpa Khadka

This community celebrates our individuality while offering holistic care. With tailored activities, I've found passions I never knew existed, making aging graceful and joyful.

Purna Raut

This program respects and empowers us. Educational sessions and social events keep us connected, proving that life's purpose knows no age limits

Radha Chavan

Copyright© All right reserved Aadhar Services. Oyster Technology.