Narayan Peth, Pune 30
24 Hours Available
( फोन आला काय आणि फक्त डॉक्टर च नंबर अमन ने share केला एवढंच काय ,पण त्याच्या महत्त्वाच्या आणि गरजेच्या वेळी आधार सर्व्हिसेस चा उपयोग झाला ह्यातच आमचा हेतू साध्य झाला ,आम्ही त्यांच्या उपयोगी पडलो हेच आमच्या साठी कामाची पावती आणि Special धन्यवाद Doctor आमच्या सोबत अगदी पहिल्या दिवसापासून आहात त्यासाठी . long way to go doctor)
नमस्कार. या ग्रुपवर आलेल्या 'आधार सर्विसेस'या सेवेचा अभिप्राय देण्यासाठी आणि आधार सर्विसेस चे आभार मानण्यासाठी ही पोस्ट लिहीत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे 2जुलै 2022ला माझ्या नव्वद वर्षांच्या सासूबाईंचे दुःखद निधन झाले. त्यांची एकूण तब्येत आणि वय या सगळ्याचा विचार करता त्यांना दवाखान्यात अँडमिट करायचं नाही असा आम्ही सगळ्यांनी आधीच निर्णय घेतला होता.गेल्या वर्षभरात अशक्तपणामुळे त्यांचं स्वतंत्रपणे चालणं बंद झालं होतं आणि शेवटचे दहा बारा दिवस त्या अंथरुणातून उठूही शकत नव्हत्या. हळूहळू त्यांची अन्नपाण्यावरची इच्छा नाहीशी होऊन अशक्तपणा आणखीनच वाढला आणि शेवटचे चार दिवस त्यांना इतकी ग्लानी आली की डोळेही उघडता येत नव्हते.आम्ही अखंड त्यांच्या बरोबर होतो.दूध,सूप,खीर,मऊ भात,साखरपाणी भरवत होतो.वेगवेगळी स्तोत्रं म्हणत होतो.एक जुलैला दुपारी साडेतीन नंतर त्यांनी कोणताही प्रतिसाद देणेही बंद केले.आणि अखेर २जुलैला सकाळी हळूहळू त्यांचा श्वासही थांबला. पण त्यांचा म्रुत्यू झालाय की त्या कोमात गेल्या आहेत याचा निर्णय आम्हाला घेता येईना. मनाची कितीही तयारी केली असली तरी आपल्या कुटुंबियाचा शेवट स्वीकारणे अतिशय कठीण असते.अशावेळी मला या ग्रुपवर वाचलेली आधार सर्विसेस ची माहिती आठवली. त्यांची लिंक मी सेव्ह करुन ठेवली होती.फोन लावताक्षणी त्यांच्याकडून मदत मिळाली आणि डॉ. पुणतांबेकर या डॉ. चा नंबर त्यांनी दिला.डाँ.पुणतांबेकर यांनीही ताबडतोब प्रतिसाद देऊन घरी येण्याची तयारी दाखवली.आम्ही राहतो कोथरुडला.डॉ. पुणतांबेकर सातारा रोड परिसरात होते.तरी त्यांनी तासाभरात येऊन सासूबाईंना तपासलं आणि आम्हाला वाटणाऱ्या दुःखद शंकेवर शिक्कामोर्तब केलं.विशेष म्हणजे आम्ही ताबडतोब देऊ केलेले व्हिजीट फीचे पैसेही त्यांनी नाकारले.दोन तीन दिवसांनी वारंवार आग्रह केल्यानंतर त्यांनी ते पैसे स्वीकारले.
त्यादिवशी आमच्या मनावर इतका ताण आला होता की सासूबाईंचा श्वास बंद झाला असूनही आम्हाला त्यांचा श्वास चालू आहे असा भास होत होता आणि थरथरत्या हाताने आँक्सिमीटर वापरल्यामुळे सासूबाईंची आँक्सिजन लेवलही नीट आहे असं दिसत होतं.अशा अत्यंत तणावाच्या क्षणी डॉ. पुणतांबेकर आल्यामुळे आम्हाला खूपच धीर वाटला आणि त्यांनी योग्य मार्गदर्शन करुन आम्हाला भानावर आणलं.ना ओळख ना भेट केवळ फेसबुकवरच्या एका पोस्टवरच्या संदर्भाने आधार सर्विसेसच्या सेवेमुळे आम्हाला तो अत्यंत दुःखद क्षण स्वीकारणे सोपे गेले.
धन्यवाद 'आधार सर्विसेस'.
धन्यवाद डॉ. पुणतांबेकर..
इच्छुकांनी या लिंकचा वापर करुन त्यांच्याशी संपर्क साधावा.
Copyright© All right reserved Aadhar Services. Oyster Technology.